मल्याळम सुपरस्टार मोहनलाल हे सध्या ‘जिंदा बंदा’ गाण्यावरील डान्समुळे चर्चेत आहेत. कोचीमध्ये पार पडलेल्या अवॉर्ड शोमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील गाण्यावर मोहनलाल थिरकले. मोहनलाल यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखलादेखील मोहनलाल यांच्या या डान्सची भुरळ पडली आणि शाहरुखने या अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं. किंग खानने मोहनलाल यांचा व्हायरल व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करीत त्याला कॅप्शन दिलं, “तुम्ही हे गाणं माझ्यासाठी खूप खास बनविल्याबद्दल धन्यवाद मोहनलाल सर! आता मला असं वाटू लागलं आहे की, मी तुमच्याइतकं जरी चांगलं करू शकलो असतो तरी मला समाधान मिळालं असतं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर. तुम्ही घरी जेवायला येण्याची मी वाट पाहत आहे सर. तुम्ही खरे ‘जिंदा बंदा’ आहात.”

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

शाहरुखने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवरदेखील मोहनलाल यांचा व्हिडीओ शेअर केला आणि आपली प्रतिक्रिया दिली. मोहनलाल यांच्यासाठी शाहरुखने दिलेली प्रतिक्रिया पाहून या मल्याळम सुपरस्टारनेही प्रतिसाद दिला. मोहनलाल यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिलं, “प्रिय शाहरुख तुझ्यासारखा डान्स कोणीही करू शकत नाही. तू तुझ्या क्लासिक, अप्रतिम शैलीत खराखुरा ‘जिंदा बंदा’ आहेस आणि नेहमीच राहशील. तुझ्या या प्रेमळ शब्दांबद्दल धन्यवाद! आणि फक्त जेवण का? न्याहारी करतानादेखील आपण ‘जिंदा बंदा’वर थिरकू शकतो.”

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…

‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुखने प्रियामणी, सान्या मल्होत्रा ​​यांच्यासह ‘जिंदा बंदा’ गाण्यावर डान्स केला आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला जवान हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वांत मोठा हिट चित्रपट ठरला.

हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अर्पिता खान पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात; व्हिडीओ व्हायरल

‘बॉलीवूड हंगामा’नुसार, ‘जवान’ हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटानं भारतात ६४३.८७ कोटी रुपयांची कमाई केली. तर ‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर या चित्रपटानं ११६० कोटींची कमाई केली. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटानेदेखील जागतिक स्तरावर हजार कोटींहून अधिक कमाई केली होती.

हेही वाचा… क्रांती रेडकरने बाप-लेकीच्या नात्याचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर; म्हणाली, “ती घाबरू नये म्हणून…”

दरम्यान, शाहरुखनं अद्याप त्याच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘द किंग’ असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात त्याची लाडकी लेक सुहाना खानदेखील झळकण्याची शक्यता आहे. २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द झिरो’ या चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुखनं चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेतला होता. ‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ या हिट चित्रपटांद्वारे शाहरुखनं २०२३ मध्ये कमबॅक केलं.

Story img Loader