Shah Rukh Khan and Aishwarya Rai : बॉलीवूडचे सगळे स्टार कलाकार आपल्याला एकत्र कोणत्यातरी पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा लग्नात पाहायला मिळतात. पण, याशिवाय हे सगळे सेलिब्रिटी आणखी एका गोष्टीसाठी एकत्र येतात आणि ती गोष्ट म्हणजे मुलांच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा. बहुतांश सेलिब्रिटींची मुलं धीरुभाई अंबानी स्कूल या शाळेत आपलं शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यामुळे शाहिद-मीरा, करीना-सैफ, करिश्मा कपूर, ऐश्वर्या-अभिषेक, शाहरुख-गौरी, रितेश-जिनिलीया असे सगळे कलाकार गुरुवारी रात्री ( १९ डिसेंबर ) मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या शाळेत पोहोचले होते.
धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये १९ डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील सगळ्या मुलांनी आपले परफॉर्मन्स मोठ्या उत्साहाने सादर केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी आराध्या बच्चन आणि अबराम खान यांनी एकत्र ख्रिसमस या विषयावरील एक बालनाट्य सादर केलं.
आराध्या व अबराम यांचा एकत्र परफॉर्मन्स
आराध्या आणि अबरामने सादर केलेल्या बालनाट्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपली मुलं रंगमंचावर परफॉर्म करत असल्याचं पाहाताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख-ऐश्वर्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी मोबाइल काढून लगेच हा परफॉर्मन्स रेकॉर्ड करायाला सुरुवात केली. ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) या दोघांच्याही चेहऱ्यावर यावेळी एक वेगळा आनंद झळकत होता.
हेही वाचा : करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकत्र; फोटो पाहून चाहते म्हणाले, “गीत व आदित्य…”
याशिवाय स्नेहसंमेलन समारंभ संपल्यावर सगळे घरी निघाले तेव्हा ऐश्वर्या आपल्या लेकीची विशेष काळजी घेताना दिसली. आराध्याने या बालनाट्यासाठी प्रचंड मेकअप केला असल्याने तिचा चेहरा पापाराझींना दिसू नये याची ऐश्वर्याने खबरदारी घेतली होती. ऐश्वर्यासह यावेळी अभिषेक व अमिताभ बच्चन उपस्थित होते. तर, शाहरुख ( Shah Rukh Khan ) सुद्धा पत्नी गौरी, लेक सुहाना, मॅनेजर पूजा यांच्यासह या समारंभात आला होता.
हेही वाचा : ‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”
दरम्यान, शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) व ऐश्वर्याने आतापर्यंत ‘मोहब्बतें’, ‘जोश’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘देवदास’, ‘ए दिल हैं मुश्किल’ या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.