Abram Khan Viral Video: बॉलीवूडचे स्टारकिड्स नेहमी चर्चेत असतात. तैमूर अली खान, राहा कपूरपासून अबराम खानपर्यंत प्रत्येक स्टारकिड्सचे व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. बॉलीवूडच्या स्टारकिड्सच्या गोड अंदाजाचे अनेक चाहते आहेत. सध्या शाहरुख खानचा लाडका लेक अबरामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अबरामचं दुसरं टॅलेंट समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान आणि गौरी खानचा लहान मुलगा अबरामच्या या टॅलेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अबराम गिटार वाजवत गाताना दिसत आहे. एका कार्यक्रमात अबराम लेडी गागा आणि ब्रूनो मार्स यांचं ग्रॅमी पुरस्कार विजेत गाणं ‘डाय विथ ए स्माइल’ आपल्या सुमधूर आवाजात गाताना पाहायला मिळत आहे. यावेळी अबराम स्वतः गिटार वाजवत असल्यामुळे शाहरुखचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

व्हिडीओमध्ये अबराम एका खुर्चीमध्ये बसून गिटार वाजवत तल्लीन होऊन गाताना दिसत आहे. काळ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये अबराम पाहायला मिळत आहे. अबरामचा हा गोड आवाज ऐकून सोशल मीडियावर शाहरुखचे चाहते त्याला सल्ला देत आहेत की, अबरामला गायक म्हणून लॉन्च कर. तसंच दुसरा चाहता म्हणाला की, अबराम खान कुटुंबातील सर्वात गोड मुलगा आहे. तर तिसऱ्या चाहत्याने लिहिलं, “२५ वर्षे मुलांना इंग्रजी शिकवा. त्यानंतर २६व्या वर्षी हिंदी सिनेसृष्टीत लॉन्च करा.”

शाहरुखचा लाडका लेक अबराम ११ वर्षांचा असून तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात अबरामचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून अबराम ऐश्वर्या राय-बच्चनची मुलगी आराध्याबरोबर परफॉर्मन्स करताना दिसला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

दरम्यान, २०१३मध्ये सरोगसीच्या मदतीने शाहरुख आणि गौरी अबरामचे आई-बाबा झाले. अबरामच्या जन्मापासून शाहरुख खान नेहमी आपल्या लाडक्या मुलाबरोबर वेळ घालवताना दिसतो. बऱ्याचदा शाहरुख अबरामबरोबर वेळ घालवण्यासाठी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ब्रेक घेतो. याशिवाय आयपीएल सामन्यादरम्यान अबराम शाहरुखबरोबर जास्त दिसतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan son abram khan singing lady gaga and bruno mars song die with a smile pps