बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी चर्चेचा विषय असतो. शाहरुखप्रमाणे त्याचाही चाहतावर्ग मोठा आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्याला बऱ्याच वेळा त्याच्या वागण्यावरुन ट्रोल केलं जात. मात्र, सध्या आर्यनच्या नावाने नवी चर्चा सुरु आहे. आता आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण, यावेळी यामागचे कारण काही वेगळेच आहे. आर्यनने आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आहे. आर्यनने त्याचा दिग्दर्शन क्षेत्रात त्याचा पहिला प्रोजेक्ट सुरू केला आहे. आर्यनच्या या प्रोजेक्टमध्ये शाहरुख खान काम करताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “मला रणवीरपेक्षा रणबीर जास्त आवडतो, कारण…”; दोघांची तुलना करणारे रोहिणी हट्टंगडी यांचे वक्तव्य चर्चेत

शाहरुख खानने सोशल मीडियावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्या एका ब्रँड जाहिरातीचा टीझर आहे. या जाहिरातीत शाहरुख खानने काम केलं आहे. शाहरुख खान आपल्या मुलाच्या दिग्दर्शनाखाली काम करून प्रसिद्धीझोतात आला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच स्टार्सही आर्यनला त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत.

आर्यन खानच्या डेब्यूची त्याचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. २०२२ मध्ये बातमी आली होती की शाहरुख खानचा मुलगा लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासंबंधीचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. आर्यन खाननेही एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो रिकामे रजिस्टर घेऊन जाताना दिसत आहे. पण लेखकाच्या आधी आर्यन खान दिग्दर्शक म्हणून सर्वांसमोर आला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan son aryan khan shoot his frist ad as a director viral on social media dpj