बॉलीवूड विश्वातील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीत अग्रगण्य असणारे दोन मुख्य अभिनेते म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). या दोन्ही कलाकारांनी त्यांचा एक काळ गाजवला आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. शाहरुख व अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. शिवाय शाहरुख आणि अमिताभ बच्चन या सुपरस्टार्सचं नातंदेखील फार घट्ट आहे. पण मध्यंतरी एक काळ असा आला होता, ज्यात दोघांमधील शत्रुत्वाबद्दलच्या अनेक चर्चा झाल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या कथित शत्रुत्वाच्या चर्चा शाहरुखने फेटाळल्या

१९७०-८० च्या दशकात अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी आपल्या अभिनयाची जादू पसरवली होती. तर त्यांच्या पाठोपाठ ९० च्या शाहरुखने आपलं गारुड निर्माण केलं. याच काळात या दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या आणि शत्रुत्वाबद्दल शाहरुखने (Shah Rukh Khan) स्पष्टीकरण दिलं होतं. २००७ मध्ये शाहरुखने रेडिफच्या मुलाखतीत या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावले. तसंच अभिनेत्याने अमिताभ बच्चन यांचे कौतुकही केले.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या कथित शत्रुत्वाबद्दल शत्रुत्वाबद्दल शाहरुख खानचं स्पष्टीकरण

याबद्दल शाहरुख (Shah Rukh Khan) असं म्हणाला होता की, “मला वाटते, या चर्चानिर्मितीचं कारण माध्यमं आहेत. ते बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहेत आणि शेवटी त्यांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. पण माझ्यात आणि बच्चनजींमध्ये काहीही नाही”. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शाहरुखने अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित भूमिका साकारल्या होत्या. शाहरुखने अमिताभ यांच्या ‘डॉन’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम केले होते.

‘कौन बनेगा करोडपती’साठी अमिताभ यांच्यानंतर शाहरुख सर्वोत्तम पर्याय

शाहरुखने (Shah Rukh Khan) २००७ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालनदेखील केले होते. अलीकडील एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ‘कौन बनेगा करोडपती’च्या सूत्रसंचालनासाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यानंतर शाहरुख हा सर्वोत्तम पर्याय आहे. या सर्वेक्षणात ऐश्वर्या राय बच्चन आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही या भूमिकेसाठी प्रबळ दावेदार होते.

‘या’ चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते अमिताभ बच्चन व शाहरुख खान

दरम्यान, शाहरुख खान (Shah Rukh Khan) व अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘मोहब्बतें’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना आपलया अभिनयाने वेड लावलं. त्यानंतर या दोघांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं नाही. त्यामुळे आता आगामी काळात हे दोघे पुन्हा एकत्र करणार का? याची अनेक चाहते मंडळी वाट पाहत आहेत.

Story img Loader