बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान ३० वर्षांहून अधिक काळापासून सिनेइंडस्ट्रीत आहे. या काळात त्याने आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. शाहरुख उत्तम अभिनेता आहेच, पण तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांची मनापासून काळजीही घेतो. कॉमेडियन सुनील पालने एका मुलाखतीत दावा केला की शाहरुख खान झोपडपट्टीत जायचा, कारण त्याचा एक कर्मचारी तिथे राहत होता.

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाला, “शाहरुखकडे सुभाष नावाचा एक मुलगा काम करायचा, आता तो हयात नाही. तो माझ्या झोपडपट्टीत राहत होता, मी तिथे भाड्याने राहत होतो. शाहरुख खान ४-६ महिन्यांतून एकदा त्याच्या घरी जायचा. त्याच्या मुलाचा वाढदिवस असेल किंवा इतर काही प्रसंग असेल तर तो भेटायला जायचा. रात्री १२ किंवा १ नंतर अंधारात तो यायचा आणि १०-१५ मिनिटं थांबून निघून जायचा.”

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

सुनीलने सिंगापूर दौऱ्यात शाहरुखला भेटल्याची आठवण सांगितली. “मी सिंगापूरला टूरसाठी गेलो होतो, त्यासाठी मोरानी बंधूंनी मला २० हजार रुपये दिले होते. तिथल्या एका स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मला आठवतं कार्यक्रमानंतर शाहरुखने माझ्यासह प्रत्येक कलाकाराची प्रेक्षकांशी ओळख करून दिली होती. तिथे गणेश हेगडेही होता. त्याने मला ग्रीन रूममध्ये येऊन शाहरुखच्या समोर परफॉर्म करण्यास सांगितलं होतं. हातात ड्रिंक आणि सिगारेट घेऊन तो रुममध्ये आला आणि मी त्याच्यासमोर त्याच्या लोकप्रिय डॉयलॉग्सची मिमिक्री करू लागलो,” असं सुनील म्हणाला.

‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन

एकदा आमिर खानसाठी परफॉर्म केल्याचं सुनीलने सांगितलं. “एकदा आमिर खान हजर असलेल्या लगान टूरला मी गेलो होतो. त्यावेळी ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’ सुपरहिट झाले होते. आमिर दौऱ्यापूर्वी ऑडिशन घेईल आणि त्याच्या परवानगीशिवाय पुढे काहीच होणार नाही, असं मला सांगण्यात आलं होतं. आशुतोष गोवारीकर यांनी माझी आमिरशी ओळख करून दिली आणि मी त्याला मिमिक्री करून दाखवली. त्यावेळी आमिरने माझा आत्मविश्वास वाढवला होता. तो माझ्या पहिल्याच पंचवर हसला आणि मला दौऱ्यावर नेण्यास तयार झाला होता. त्या दौऱ्यात मी प्रीती झिंटाबरोबर ‘पिया पिया’ गाण्यावर डान्स केला होता,” असं सुनीलने सांगितलं.

मावशी खासदार झाल्यावर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, प्रणिती शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

शाहरुख आणि आमिर हे स्टार आहेत कारण ते इतर कलाकारांचा आदर करतात, त्यांच्यामध्ये अहंकार नाही. हे दोघेही खूप साधे आणि नम्र आहेत. आमिर खान तर खाली जमिनीवर बसून इतरांशी गप्पा मारतो, असं सुनील पाल म्हणाला.

Story img Loader