बॉलीवूडचा किंग खान शाहरुख लवकरच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढच नव्हे तर किंग खानच्या या चित्रपटात त्याची लाडकी लेक सुहाना खानदेखील झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘किंग’असून सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांसारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकांचा यात सहभाग असणार आहे. हा चित्रपट शाहरुखची कंपनी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ अंतर्गत बनवला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच, शाहरुखने या चित्रपटासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली होती. आता या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दलची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात शाहरुख अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणार आहे म्हणूनच या चित्रपटाच नाव ‘किंग’ असं आहे. ‘लिओन: द प्रोफेशनल’ नावाच्या हॉलिवूड चित्रपटापासून ‘किंग’ प्रेरित असल्याची चर्चा असली तरी अद्याप याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीला रोज लपवावा लागतो ‘हा’ टॅटू; अभिनेत्रीने व्हिडीओ केला शेअर

पिंकविलाच्या वृत्तानुसार, “सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांच्याबरोबरीनेच शाहरुखसुद्धा चित्रपटाच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी मेहनत घेत आहे. या तिघांनी मिळून ‘किंग’ चित्रपटासाठी शाहरुखची एक कूल, स्वॅग अशी व्यक्तिरेखा तयार केली आहे.”

चित्रपटाचे शीर्षक ‘किंग’ ठेवण्यामगचं कारण म्हणजे, सुपरस्टारची व्यक्तिरेखा ‘अंडरवर्ल्डचा किंग’ अशी आहे. शाहरुख खान या चित्रपटात गुरूच्या भूमिकेत तर सुहाना त्याच्या शिष्याच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये काही इंटेन्स ॲक्शन सीन्सही दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा… ऐश्वर्या नारकर यांचा साडीतला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहते म्हणाले, “अदा, तुमच्यावर सारे फिदा…”

हा प्रोजेक्ट शाहरुखच्या खूप जवळचा आहे. सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष या दिग्दर्शकांसमवेत या चित्रपट निर्मीतीच्या प्रत्येक टप्प्यात शाहरुख त्याचं योगदान देतोय. हा चित्रपट रद्द झाल्याच्या अनेक अफवा याआधी आल्या होत्या परंतु हा चित्रपट त्याच्या योग्य मार्गावर आहे. त्यांनी प्री-प्रॉडक्शनसाठी त्यांचा वेळ घेतला आहे आणि या चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होणार आहे. तर हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… बहीण आरती सिंहच्या संगीतदरम्यान कृष्णा अभिषेक-कश्मीरा शाहने केलं किस; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चिज’ या चित्रपटाद्वारे सुहाना खानने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. लवकरच सुहाना किंग खानबरोबर नव्या भूमिकेत सज्ज होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan will be seen with his daughter suhana khan in the upcoming film king dvr