पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकाऱण्यांपासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांबरोबर शाहरुखने मोदींना एक सल्लाही दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘जवान’मध्ये थलपती विजयचा कॅमिओ का नव्हता?, दिग्दर्शक अ‍ॅटलीने सांगितलं खरं कारण; म्हणाला, “दुसरा भाग…”

शाहरुखने ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने लिहिलं ” ‘माननीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा दिवस आरोग्य आणि आनंदाने भरलेला जावो. तुम्ही कामातून थोडा वेळ काढा आणि मजाही करा. शुभेच्छा.”

शाहरुख व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानने देखील पंतप्रधान मोदींना ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखन लिहिलं. “माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.” याशिवाय वरुण धवनने पीएम मोदींचा एक फोटो शेअर करत लिहिले, “प्रिय सर, तुम्ही सिंहासारखी गर्जना करता आणि जग टाळ्या वाजवते. वाढदिवसाच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. जयहिंद..”

शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७२ कोटींची कमाई केली होती. भारतात या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ६०० कोटींचा गल्ला जमवला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रटाने अनेक रेकॉर्ड तयार केले आहेत.

हेही वाचा- करण जोहरला मिळालेली अंडरवर्ल्डकडून धमकी, शाहरुख खानने मित्राला दिली ‘अशी’ साथ; म्हणाला, “बंदुकीच्या गोळ्या…”

‘जवान’ नंतर शाहरुख खान लवकरच ‘डिंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नूही दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan wished pm narendra modi on his birthday and said take a leave from work dpj