अभिनेत्यांप्रमाणे त्यांच्या पत्नीदेखील चर्चेत असतात. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि त्याची पत्नी हे दोघे आदर्श जोडपे मानले जातात. शाहरुख-गौरी गेली ३१ वर्ष सुखाचा संसार करत आहेत. १९९१मध्ये शाहरुख-गौरीने लग्न केलं. आता त्यांना आर्यन, सुहाना, अबराम अशी तीन मुलं आहे. गौरीने नुकतंच एका मुलाखतीत कौटुंबिक आयुष्याबद्दल सांगितले आहे.
गौरीने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांचे घर म्हणजे मन्नत हे तिच्या आईच्या म्हणण्यांनुसार चालते, तिने सांगितले की माझी आई दिल्लीत बसून आमच्यावर आणि संपूर्ण घरावर नजर ठेवते. गौरी पुढे म्हणाली, ‘आमच्या घरातील कर्मचारी तिच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने संपर्कात राहतात. घरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा यावर तिचा भर असतो. तसेच ती माझ्या कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवते’.
Photos : बॉलिवूडच्या ‘या ‘अभिनेत्री पतीपासून झाल्या विभक्त; नंतर मात्र सिंगल राहणंच केलं पसंत
शाहरुख, गौरी मूळचे दोघे दिल्लीचे, दिल्लीत दोघांचे प्रेमप्रकरण जमले मात्र शाहरुखला बॉलिवूडमध्ये नाव कमवायचं होत त्यासाठी तो मुंबईला आला, सुरवातीला मालिका नंतर चित्रपटात त्याला काम मिळू लागले. प्रेमात बरेच चढ-उतार पहिल्यानंतर १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं आणि आता हे तीन मुलांचे आई- वडील आहेत. आजही गौरी खान शाहरुखच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
शाहरुख गौरी या दोघांची मिळून रेड चिलीज एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था आहे. या संस्थेत गौरी खान चित्रपटाच्या निर्मितीची काम बघते. गौरी स्वतः पेशाने इंटेरियर डिझायनर आहे. तिने करण जोहरची टेरेस तसेच यश आणि रुहीची नर्सरी डिझाइन केली आहे. तिने रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस या लोकप्रिय कलाकारांच्या घराचे इंटिरियर्स केले आहे.