एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी एलॉन मस्कने ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं होतं. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अनेक ब्लू टिक असलेल्या अकाऊंटचं टिक त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काढून टाकण्यात आलं आहे. यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता शाहिद कपूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटरने ब्लू टिक काढलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन, योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांसारख्या अनेकांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. ब्लू टिक हटवल्यानंतर आता शाहिद कपूरने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : Twitter Blue Tick: ट्विटरने सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चनसह ‘या’ सेलिब्रिटींच्या अकाउंटवरील ब्लूट टिक हटवली
ब्लू टिक हटवल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. त्यातच एका नेटकऱ्याने शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटातील एक दृश्य दाखवण्यात आले आहेत. यात शाहिद हा बुलेट घेऊन रागात कुठेतरी जाताना दिसत आहे. “ब्लू टिक हटवल्यानंतर शाहिद कपूर हा एलॉन मस्ककडे जात आहे आणि माझं ब्लू टिक परत दे”, असे सांगत आहे.
या मीमवर शाहिदने कमेंट केली आहे. “माझ्या ब्लू टिकला कोणी हात लावला… एलॉन… तू तिथेच थांब, मी येतोय”, असे शाहिद कपूरने ट्वीट करत म्हटले.
आणखी वाचा : Video : काजोल आणि अजयची लेक निसाचं वय नेमकं किती? वाढदिवसाचा केक पाहून नेटकरी म्हणाले “ती २५-२६ वर्षांची…”
दरम्यान एलॉन मस्कनं २० एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं जाहीर केलं होतं. पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ट्विटरनं कारवाई केलेल्या अकाऊंट्समध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, किंग खान शाहरूख, अमिताभ बच्चन, आलिया भट, रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश आहे.