अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात शाहिद जबरदस्त अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, डायना पेंटी, रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
शाहिदचा हा चित्रपट ओटीटी माध्यमावर ९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. जिओ सिनेमा या ओटीटी अॅपवर तुम्हाला हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये शाहिदचा हा चित्रपट प्रदर्शित न होता ओटीटीवर का प्रदर्शित होत आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या मागचा खुलासा केला आहे.
चित्रपटाचे निर्माते अब्बास अली म्हणाले की, प्रत्येक चित्रपटाची स्वतःची सिनेमॅटिक भाषा असते आणि ‘ब्लडी डॅडी’ची कथा योग्य पद्धतीने सांगण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची गरज आहे. चित्रपटाचा कंटेंट वाढत आहे आणि गेल्या तीन वर्षांत, प्रेक्षकांच्या पसंती कशा बदलल्या आहेत हे आपण सर्वांनी पाहिले आहे. तसेच, जेव्हा तुम्ही OTT साठी कंटेंट तयार करता, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणे एक मोठी जबाबदारी आहे, कारण जगभरातील लोक ते पाहत असतात.आम्हाला हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यासाठी त्यात छेडछाड करायची नव्हती आणि म्हणून आम्ही तो डायरेक्ट-टू-डिजिटल रिलीज करण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा- शाहिद कपूरबाबत प्रसिद्ध अभिनेत्याची भविष्यवाणी; म्हणाला, ‘आता याचं करिअर ..’
शाहिदने ‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये, “वन हेल ऑफ ब्लडी नाईट…” असे लिहिले आहे. ‘ब्लडी डॅडी’च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर दमदार अॅक्शन आणि फायरिंग करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना रोमॅंटिक हिरो, चॉकलेट बॉय याव्यतिरिक्त शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.