बॉलीवूड कलाकारांना पापाराझी अनेक ठिकाणी फॉलो करत असतात. घराबाहेर असो किंवा विमानतळावर बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दलचे प्रत्येक अपडेट विविध इन्स्टाग्राम पेजवर नेटकऱ्यांना पाहायला मिळतात. अनेकदा या कलाकारांचे पापाराझींबरोबर वाद होतात. अभिनेता शाहिद कपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आधीपासून मतभेद…”, ‘गदर २’च्या यशानंतर अमीषा पटेलने केला खुलासा; म्हणाली, “माझ्याकडे सगळे पुरावे आहेत”

अभिनेता शाहिद कपूर भर रस्त्यात पापाराझींवर भडकल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. शाहिद पत्नी मीरा राजपूत आणि संपूर्ण कुटुंबासह बाहेर जात असताना पापाराझींनी त्याला मोठमोठ्याने आवाज देण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : प्रसाद ओकचा नवा चित्रपट ‘जिलबी’च्या चित्रीकरणास सुरुवात; पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला…

शाहिद उपस्थित पापाराझींना हळू बोला, ओरडू नका असं सांगत होता. अभिनेता म्हणाला, “मी गाडीतून जातोय आणि तुम्ही ओरडत आहात हे मी समजू शकतो परंतु, उगाच असं ओरडू नका…मी इथेच उभा आहे.” हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा : “…यामुळे सेटवर एका क्षणात शिवानी रांगोळेला येतं रडू” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम ऋषिकेश शेलारनं केली पोलखोल

शाहिद कपूरचा राग पाहून उपस्थित सगळेच शांत झाल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. एका युजरने, “शाहिदने अगदी बरोबर केल” अशी प्रतिक्रिया कमेंटमध्ये दिली आहे. दरम्यान, शाहिद कपूर शेवटचा ब्लडी डॅडी चित्रपटात दिसला होता. लवकरच तो आगामी चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor gets angry as paparazzi rush to click photos of his family sva 00