Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection Day 1: शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये आलेला हा रोमँटिक ड्रामा चित्रपट वीकेंडला चांगली कमाई करू शकेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून तयार केलेल्या रोबोटच्या प्रेमात शाहिद कपूर पडतो, अशी चित्रपटाची कथा आहे. यातील रोबोटची भूमिका क्रिती सेनॉनने साकारली आहे. यात तिच्या पात्राचं नाव सिफ्रा आहे. शाहिद कपूरच्या पात्राचे ​नाव आर्यन अग्निहोत्री असून तो एक इंजिनिअर आहे. आर्यन रोबोटच्या प्रेमात तर पडतोच पण तिच्याशी लग्नही करतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुजराती बिझनेसमनशी गोव्यात बांधली लग्नगाठ, भर मंडपात केलं लिपलॉक, Photos चर्चेत

हा चित्रपट जवळपास ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे, असं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे, त्यामुळे वीकेंडला या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भर पडेल, असं दिसतंय. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केलं आहे. दिनेश विजान, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उटेकर यांनी त्याची निर्मिती केली आहे.

“बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन आईवर…”, गश्मीर महाजनीने सांगितली बालपणीची आठवण; म्हणाला, “तिला लग्नाआधीच…”

शाहिद आणि क्रितीसह धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शाहिद आणि क्रिती यांच्यातील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटाला IMDb मध्ये ६.५ रेटिंग मिळाले आहे.

Story img Loader