बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केला. या चित्रपटानंतर शाहिदच्या फिल्मी करियरला एक वेगळंच वळण मिळालं. आता तो ओटीटी विश्वातही नशीब आजमावून बघत आहे. नुकतीच त्याची प्राइम व्हिडीओवरील ‘फर्जी’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली, त्यानंतर आलेला ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा शाहिदने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा त्याची तुलना ही कायम किंग खान शाहरुख खानशी केली जायची. शाहिदची हेअर स्टाइल, त्याच्या अभिनयाची शैली हे सगळं किंग खानशी मिळतं जुळतं वाटत असल्याने त्याला प्रती शाहरुखही म्हंटलं जायचं. आता नुकतंच याबद्दल शाहिदने वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा : आयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार लतादीदींचे स्वर; उद्घाटनासाठी दीदींनी रेकॉर्ड केलेले खास भजन व श्लोक

‘पिंकव्हीला’शी संवाद साधताना शाहरुखशी होणाऱ्या तुलनेबद्दल शाहिद उद्विग्न होत म्हणाला, “ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, तुम्हाला इतर कोणासारखं होण्याची काय गरज आहे? अशी तुलना होणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. एखाद्या यशस्वी व्यक्तीशी तुलना करून तसंच यश दुसऱ्याच्या नशिबी लिहिलं असेल हा विचार करणंही मूर्खपणाचं लक्षण आहे.”

शाहिद सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याचा आणि करीनाच्या ‘जब वी मेट २’ची सुद्धा चर्चा सुरू होती, पण दिग्दर्शकाने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. शाहिद आता लवकरच अभिनेत्री क्रीती सेनॉनबरोबर एका रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, अद्याप या चित्रपटाचं नाव ठरलेलं नसलं तरी याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor reacts on being compared with shahrukh khan actor says its worst thing avn