शाहिद कपूर(Shahid Kapoor) व करीना कपूर खान( Kareena Kapoor Khan)हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्या चित्रपटांमुळे ते सातत्याने चर्चेत येत असतात. करीना व शाहिद यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘जब वी मेट’ या चित्रपटातील त्यांची पात्रे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. गीत व आदित्य यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. याबरोबरच ते अनेक वर्षे रिलेशनशिपमध्येदेखील होते. मात्र, कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. १८ वर्षांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झाले होते, आता नुकत्याच एका सोहळ्यादरम्यान त्यांनी एकमेकांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

आयफा अवॉर्ड सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. शाहिद कपूर, करीना कपूर, करण जोहर, कार्तिक आर्यन, क्रिती सेनॉन असे अनेक कलाकार सोहळ्यात दिसले. यावेळी करीना व शाहिद यांची भेट झाली. त्यांनी एकमेकांना मिठी मारत भेट घेतली. तसेच, त्यांच्यात बराच वेळ संवाद चालू असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट्स करीत कौतुक केले. ‘जब वी मेट’मधील गीत व आदित्यला अनेक वर्षांनंतर एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला असल्याचे पाहायला मिळाले. आता शाहिद कपूरने करीना कपूर खानच्या भेटीनंतर त्यावर वक्तव्य केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने करीनाबरोबरच्या भेटीवर बोलताना म्हटले, “आमच्यासाठी हे नवीन नाही, आज स्टेजवर भेटलो आहे, आम्ही इतर ठिकाणीदेखील भेटत असतो. पण, आमच्यासाठी खूप नॉर्मल आहे, जर लोकांना छान वाटलं असेल तर ते छान आहे”, असे म्हणत करीनाच्या भेटीवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, २००७ ला इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, यामध्ये करीना कपूर व शाहिद कपूर हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच करिना व शाहिद यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर शाहिद कपूरने २०१५ ला मीरा राजपूतशी लग्नगाठ बांधली; तर करीना कपूरने २०१२ मध्ये बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्नगाठ बांधली. आता अनेक वर्षांनंतर त्यांची भेट झाल्याचे समोर येताच चाहत्यांना आनंद झालेला पाहायला मिळाला. आता हे कलाकार कोणत्या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader