अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या त्याच्या आगामी चित्रपटमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन या दोघांनीही चित्रपटाचे खूप प्रमोशन केले आहे. आता चित्रपटाचे प्रमोशनल इव्हेंट्स संपले आहेत आणि शाहिद कपूरने एक खास रील शेअर केली आहे. ही रील आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहिद कपूर चाहत्यांसह अनेकदा कॉमेडी रील्स शेअर करताना दिसतो. गुरुवारी त्याने एक रील त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या रीलचा मूळ ऑडिओ विराट कोहलीचा आहे. या रीलमध्ये शाहिद कपूर क्रिकेटच्या बॅटसह जबरदस्त अभिनय करताना दिसत आहे. प्रमोशन संपल्यानंतरचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या रीलच्या कॅप्शनमध्ये, ‘प्रमोशन संपल्यानंतरची भावना’ असे शाहिदने लिहिले.

कोहलीच्या बायोपिकसाठी सर्वोत्तम पर्याय

शाहिद कपूरच्या या रीलवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “कोहलीच्या बायोपिकसाठी शाहिद सर्वोत्तम पर्याय आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, “शाहिदला बॉलीवूडची गरज नाही तर बॉलीवूडला शाहिद कपूरची गरज आहे.”

हेही वाचा… आलिशान बंगला सोडला, लक्झरी गाडी विकली, चित्रपटसृष्टीपासूनही दूर; अभिनेता इम्रान खान सध्या करतोय तरी काय?

दरम्यान, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर एका रोबोट सायंटिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासह अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जी एआय रोबोटची भूमिका साकारणार आहे. डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor reel on virat kohli viral audio for his movie promotion dvr