बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांना गीत आणि आदित्यची प्रेमकहाणी एवढी आवडली की, काही महिन्यांपूर्वीच ‘जब वी मेट’ चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीने होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील सीन वादाच्या भोवऱ्यात; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड कधीच…”

शाहिदने नुकत्याच दिलेल्या ‘मिडे-डे’च्या मुलाखतीत ‘जब वी मेट’बाबत आणि या चित्रपटाचे हटके नाव कोणी ठेवले याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, “दिग्दर्शक इम्तियाज अली सर्वप्रथम माझ्याकडे ‘गीत’ या पात्राची स्क्रिप्ट घेऊन आला होता. स्क्रिप्टवर ‘गीत’ लिहिलेले पाहून मी त्याला विचारले ‘गीत’ हे कोणते गाणे आहे, चित्रपटात त्या गाण्याचा अर्थ काय असेल? यावर इम्तियाजने सांगितले, ‘गीत हे चित्रपटातील नायिकेचे नाव आहे.’ त्यावर मी त्याला म्हणालो, पुढच्या वेळी जेव्हा तू हिरोकडे जाशील तेव्हा हिरोईनच्या नावाची स्क्रिप्ट घेऊन जाऊ नकोस. त्यानंतर येताना त्याने स्क्रिप्ट आणली त्यावर ‘ट्रेन’ लिहिले होते.”

हेही वाचा : “आयुष्यातील पहिले कथक नृत्य…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘जब वी मेट’ हे नाव कोणी ठेवले याबद्दल सांगताना शाहिद म्हणाला, “माझे वडील पंकज कपूर राजमा चावल खात असताना त्यांना अचानक ‘जब वी मेट’ हे नाव सुचले होते. मी त्यांना म्हणालो होतो आम्हाला अर्धे इंग्रजी आणि अर्धे हिंदी असे नाव हवे आहे. कारण, हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला भिडणारा आहे. मी त्यांना सगळी गोष्ट समजून सांगितली होती, त्यानंतर माझ्या वडिलांनी ‘जब वी मेट’ हे नाव सुचवले.”

हेही वाचा : Video : “बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले…”, जिनिलीया आणि रितेश देशमुखचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

“माझ्या वडिलांनी सुचवलेले ‘जब वी मेट’ हे नाव मी इम्तियाज अली आणि निर्मात्यांना सांगितले. पुढे ‘भटिंडा एक्सप्रेस’, ‘जब वी मेट’, आणि तिसरे नाव मला आता आठवत नाही या तीन नावांमध्ये आम्ही एक स्पर्धा घेतली आणि अखेर बहुमताने ‘जब वी मेट’ या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.” असे शाहिदने सांगितले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor reveals this person suggested the title of jab we met it was after contest in papers sva 00