बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘देवा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. शाहिद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याची पत्नी मिरा राजपुतसुद्धा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी तिच्या सुंदरतेपुढे मोठमोठ्या अभिनेत्री फिक्या दिसतात. अशात शाहिदची पत्नी मिरा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या आयुष्यातील जोडीदार कसा असावा आणि कसा असू नये हे प्रत्येक व्यक्तीचे ठरलेले असते. शाहिद कपूरने आजवर अनेक पात्र साकारली आहेत. कधी ‘जब वी मेट’मधील चॉकलेट बॉय आदित्य तर कधी रागावर अजिबात नियंत्रण नसलेला ‘कबिर सिंग’, ‘उड़ता पंजाब’ चित्रपटातील रॉकस्टार अशा विविध भूमिकांपैकी शाहिदची पत्नी मिराला त्याची कोणती भूमिका आवडते असं त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर त्याने मोकळेपणाने उत्तर देत आजही पत्नीचा ओरडा खावा लागतो असं म्हटलं आहे.

शाहिदने नुकतीच त्याच्या ‘देवा’ चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त बॉलीवूड हंगामाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याला विचारण्यात आलं की, मिराला तुझा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो? आतापर्यंत तू साकारलेल्या कोणत्या पात्रासारखं तू असावं असं तिला वाटतं? या प्रश्नांवर उत्तर देत शाहिदने पटकन ‘जब वी मेट’ चित्रपटाचं नाव सांगितलं, “मला आजही यावरून ओरडा खावा लागतो. ती म्हणते, मला वाटलं तू तर आदित्य सारखा असशील. पण, तू ५ टक्केसुद्धा तसा नाही. त्यावर मी तिला म्हणतो आनंदी हो कारण मी ५ टक्के कबीर सिंग सारखाही नाही.”

शाहिदने आजवर विविध आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘देवा’ चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. मात्र, प्रेक्षकांना आजही त्याचा ‘जब वी मेट’ चित्रपट फार आवडतो. यातील गीत आणि आदित्यची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच भावली होती. या चित्रपटात गीत हे पात्र करीना कपूरने साकारलं होतं. शाहिददेखील त्याच्या मुलाखतींमध्ये या चित्रपटा उल्लेख करत असतो. याआधीही त्याने एका मुलाखतीमध्ये गीत आणि आदित्यच्या नात्याचा उल्लेख केला होता. तसेच “ते दोघे आता एकत्र असते तर आतपर्यंत त्यांचा घटस्फोट झाला असता”, असं शाहिदने म्हटलं होतं.

दरम्यान, शाहिदच्या ‘देवा’ चित्रपटाबद्दल बोलयचे झाल्यास यामध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसेल. तसेच कुबरा सैत, गिरीश कुलकर्णी, प्रवेश राणा, पावेल गुलाटी हे कलाकारही अन्य महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. ३१ जानेवारी २०२५ रोजी शाहिदचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor said his wife mira wants him to be like aditya from jab we met movie rsj