बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता ‘पिंकविला’ने शाहिद कपूरची त्याच्या मुलीच्या जन्मानंतर काय प्रतिक्रिया काय होती, हे सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. कोमल नाहटा यांना दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Name Change After Marriage
लग्नानंतर नाव बदलायचं नव्हतं, पण सासरच्यांनी केला विरोध अन्…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sadhguru Isha Foundation Raid News:
जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाची झडती; मद्रास उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
Shocking video Brave Mother Saved his Kid from Stray Dogs in Karimnagar Telagana
VIDEO: “शेवटी विषय काळजाचा होता” कुत्र्यांच्या तोंडी स्वत:चा जीव दिला, पण बाळाला आईनं कसं वाचवलं पाहा
Kalyan, youth threatens mother, daughter marriage,
कल्याणमध्ये मुलीच्या लग्नाला विरोध केल्यास आईला ठार मारण्याची धमकी
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

‘पिंकविला’ने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर पोस्ट करताना म्हटले आहे की, तुम्हाला माहीत आहे? जेव्हा शाहिद कपूरच्या मुलीचा म्हणजेच मिशाचा जन्म झाला होता तेव्हा त्याने त्याच्या सासऱ्यांची माफी मागितली होती. एका मुलाखतीदरम्यान कोमल नाहटा यांनी अभिनेत्याला विचारले होते की, जेव्हा मिशाचा जन्म झाला तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती. या प्रश्नाला उत्तर देताना त्याने म्हटले आहे की, तो खूप आनंदी होता आणि त्याच वेळी त्याला भीतीदेखील वाटत होती. आपल्याला नुकतीच एक मुलगी झाली आहे ही बाब स्वत:ला समजावण्यासाठी वेळ घेतला. मी खूप खूश होतो; पण मुलगी असल्याने मला भीतीदेखील वाटत होती. कारण- नुकतेच माझे लग्न झाले होते आणि भविष्यकाळात माझी मुलगीदेखील कोणत्या तरी मुलाबरोबर लग्न करेल हा विचार माझ्या डोक्यात येत होता. शाहिदने पुढे म्हटले की, त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर पुढच्या ३० वर्षांनंतरचे दृश्य आले. मला मुलगी झाल्यानंतर मी लगेच मीराच्या वडिलांना फोन केला आणि त्यांची माफी मागितली. मी त्यांना म्हटले, “बाबा, जर लग्नात तुम्हाला माझ्यामुळे कोणत्या अडचणी आल्या असतील, तर मला माफ करा.” अशा प्रकारे शाहिदने मिशाच्या जन्मानंतर त्याला काय वाटले होते, याबद्दलच्या त्याने मनातल्या भावना या मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या होत्या.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली असून, २०१६ मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. शाहिद आणि मीराने तिचे नाव मिशा, असे ठेवले आहे; तर २०१८ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्या मुलाचे नाव त्यांनी जैन, असे ठेवले आहे.
शाहिद कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘देवा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिदबरोबर लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २०२३ मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि आता ११ ऑक्टोबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.