शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहिदच्या या चित्रपटातील अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. यापूर्वी अभिनेत्याच्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कियारा-शाहिदच्या जोडीने सर्वांचे मन जिंकले. मात्र, चित्रपटातील एका सीनमुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “सातारा म्हंजी काळजाचा तुकडा…”, किरण मानेंनी जन्मभूमीसाठी शेअर केली भावुक पोस्ट; नेटकरी म्हणाले, “दादा तुम्ही ग्रेट”

कबीर सिंग चित्रपटातील एका दृश्यामध्ये शाहिदने (कबीर) कियाराला (प्रीती) कानाखाली मारली होती. या सीनमुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला होता. याविषयी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ४ वर्षांनी खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, “कबीर सिंग हा चित्रपटाचा नायक सुद्धा नव्हता आणि खलनायकही नव्हता. तो केवळ मानवी स्वभाव आहे, देवदासने सुद्धा पारोला मारल्याचे आपण याआधी पाहिले आहे. हा प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि या सगळ्यात कियाराने साकारलेल्या प्रीती पात्राचे विशेष कौतुक करण्यासारखे आहे. तिने अतिशय प्रभावीपणे सगळे काही नीट समजून घेतले.”

हेही वाचा : “तू गे आहेस ना?”, विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरने दिले थेट उत्तर; म्हणाला, “तुला माझ्यात…”

शाहिद पुढे म्हणाला, “माझ्या लहानपणी शारीरिक शोषण काय असते हे मी पाहिले आहे, त्यामुळे चित्रपटातील त्या सीनचा काय परिणाम होऊ शकतो याची मला चांगलीच कल्पना आहे. ‘कबीर सिंग’ हे केवळ चित्रपटातील एक पात्र होते. प्रत्यक्षात माझ्यात आणि त्या पात्रात खूप फरक आहे. मी दारू पीत नाही, माझ्या कुटुंबीयांच्या मी फारच जवळ आहे. आजवर कोणत्याही महिलेवर हात उचलण्याचे धाडस मी केलेले नाही. हे माझ्या आईचे संस्कार आहे. पण, एक अभिनेता म्हणून मला अशा भूमिका कराव्या लागतात. प्रत्येकाला दरवेळी मी केलेल्या भूमिका आवडतीलच असे नाही.”

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील सीन वादाच्या भोवऱ्यात; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड कधीच…”

दरम्यान, शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असलेला ‘कबीर सिंग’ चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने जगभरात ३५० कोटींहून अधिक कमाई केली होती. लवकरच संदीप रेड्डी वांगा यांचा ॲनिमल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor says he has seen physical abuse as a child explains how he is not like kabir singh in real life sva 00