शाहिद कपूरचा बॉलीवूड प्रवेश झाल्यानंतर काही काळातच तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला होता. त्याची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा आजपर्यंत अधिक लोकप्रिय राहिली आहे. हे खरे असले तरी सुरुवातीच्या काही चित्रपटांनंतर त्याने आपल्या भूमिकांची निवड बदलली. अधिक आव्हानात्मक चित्रपट आणि उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटातून काम करत त्याने स्वत:ला सिद्ध केले.

आज शाहिद चित्रपटांबरोबरच ओटीटी विश्वातही धुमाकूळ घालत आहे. सध्या शाहिद त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला कोणते पात्र पुन्हा साकारायला आवडेल याबद्दल खुलासा केला आहे.

Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Blind disabled elderly sick pregnant and newlyweds can now get instant darshan in pandharpur vithal temple
अपंग, गर्भवती, नवदाम्पत्याला आता विठ्ठलाचे तात्काळ दर्शन !
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार

आणखी वाचा : “बरेच मराठी शब्द हे फारसी भाषेतील” नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज…”

या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने ‘पद्मावत’ चित्रपटातील पात्राचा उल्लेख केला. तो म्हणाला, “मला महारावल रतन सिंग ही भूमिका पुन्हा साकारायला आवडेल. त्या भूमिकेतील माझे काम मला स्वतःला अजिबात आवडलेले नाही. त्या भूमिकेसाठी मी माझ्याकडून काहीच खास असे देऊ शकलो नाही. विचारांत मी गुरफटून गेलो होतो. लोकांना ती भूमिका आवडली असेल कदाचित, पण मला त्यातील माझे काम आवडलेले नाही.”

मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान शाहिदने ‘पद्मावत’च्या सेटवर तो आऊटसाइडर असल्यासारखे वाटायचे, असाही खुलासा केला होता. नुकतेच शाहिदने ‘फर्जी’ या वेब सीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केले आणि यातील शाहिदचे काम लोकांना पसंत पडले. आता अली अब्बास जफरसह तो ‘ब्लडी डॅडी’मधून पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

Story img Loader