बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं गेल्यामुळे अभिनेता शाहिद कपूर हा चांगलाच चर्चेत होता, पण २०१५ मध्ये त्याने मीरा राजपूतशी लग्नगाठ बांधली. मीराचा चित्रपटक्षेत्राशी काहीही संबंध नाही, पण शाहिदशी लग्न केल्यानंतर तीसुद्धा लाईमलाइटमध्ये आली. ८ वर्षांच्या या सुखी संसारात या सेलिब्रिटी जोडप्याला दोन मुलंदेखील झाली.

२०१५ मध्ये जेव्हा मीरा लग्न करून प्रथम शाहिदच्या घरी आली तेव्हा आपल्या घराची अवस्था कशी होती याबद्दल शाहिदने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. शाहिद म्हणाला, “मीरा जेव्हा लग्न करून प्रथम माझ्या घरी आली तेव्हा माझ्या घरात फक्त दोन चमचे आणि एक ताट एवढ्याच वस्तू होत्या. त्यावेळी मीराने माझ्याकडे याबद्दल तक्रार केली. पण तेव्हा मी घरात एकटाच राहायचो त्यामुळे इतर वस्तूंची कधीच गरज भासली नव्हती.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…

आणखी वाचा : नसीरुद्दीन शाह यांची ‘ISRO’च्या प्रमुखांवर टीका; म्हणाले, “आपण पुन्हा अंधश्रद्धेकडे…”

पुढे शाहिद म्हणाला, “जेव्हा मीराने विचारलं की आपल्याकडे एकही डायनिंग सेट नाही, जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतील तेव्हा त्यांना कशामध्ये खायला द्यायचं. यावर मी तिला उत्तर दिलं की आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करू. यानंतर मात्र मी आणि मीरा आम्ही दोघांनी घराच्या इंटेरियरवर काम केलं आणि तिला जसं हवं होतं अगदी तसंच आम्ही आमचं घर सजवलं.”

येत्या ८ जुलैला शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांच्या लग्नाला ८ वर्षं पूरण होणार आहेत. शाहिद कपूरने नुकतंच ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. आता लवकरच त्याचा ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच शाहिद कपूर क्रीती सनॉंनबरोबर आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader