बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरबरोबर आता त्याची पत्नी मीरा राजपूतही चांगलीच चर्चेत असते. मध्यंतरी मीरा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मीराने आत्तापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. सध्या मीराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींना ‘मला घरी जाऊ द्या,’ असं म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, मीराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे. तिने क्रीमी व्हाइट आणि ब्लॅक कलरचा सुंदर पोशाख परिधान केला आहे. मीरा राजपूत कोणत्याही मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. व्हिडीओमध्ये मीरा तिच्या घराकडे जाताना दिसत आहे. मात्र, मीराला बघताच पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यास सुरुवात केली. पापाराझींचा गराडा पाहून मीरा त्यांना म्हणते की, ‘माझ्या मुलांना उद्या सकाळी शाळेत जायचं आहे. मला घरी जाऊ द्या,’ मीराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे. काहींनी मीराचे कौतुक केलं आहे युजर्सनी मुलांना सुट्टी असल्याचंही म्हटलं आहे.
अभिनेता शाहिद कपूरने २०१५ साली मीरा राजपूतशी लग्न केले. दरम्यान वयाच्या फरकामुळे मीरा आधी शाहिदशी लग्न करण्यास तयार नव्हती, असे म्हटले जाते. मात्र त्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीने तिला समजवले आणि लग्नासाठी तयार केले. लग्नाच्या वेळी शाहिद हा ३४ वर्षांचा होता. तर मीरा ही २१ वर्षांची होती. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगी मीशा कपूर आणि मुलगा झैन कपूर. गेल्या वर्षी शाहिद आणि मीरा मुंबईतील वरळी येथील त्यांच्या आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले.