बॉलीवूडचं रोमँटिक कपल शाहिद कपूर आणि मीरा कपूर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीरा आणि शाहिदला बॉलीवूडमधलं आदर्श कपल म्हणूनही ओळखलं जात. वयाच्या २१ व्या वर्षी मीरानं शाहिद कपूरशी लग्न केलं. दोघांच्या वयात १३ वर्षांचा फरक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीरा अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या पती आणि मुलांबद्दल दिलखुलासपणे बोलते. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये मीरानं तिच्या आयुष्यातल्या एका कठीण प्रसंगाबद्दल खुलासा केला. मीरा जेव्हा पहिल्यांदा गर्भवती होती तेव्हा जवळजवळ तिचा गर्भपात होणार होता. याबद्दलचा किस्सा तिनं या मुलाखतीत सांगितला आहे.

हेही वाचा… विद्या बालनची ‘या’ मराठी गाण्यावर मजेशीर रील, अमृता सुभाषच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली, “किती…”

प्रखर गुप्ताच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मीरा राजपूत म्हणाली, “हे खूप कमी जणांना माहीत असेल की, जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर होते तेव्हा २०-२१ वर्षांची होते आणि तेव्हा मी अगदी फिट होते. मी चार महिन्यांची गरोदर असताना माझा जवळजवळ गर्भपात होणार होता आणि त्या वेळेस यापेक्षा वाईट काय घडू शकतं? माझी तेव्हा सोनोग्राफी झाली आणि मला डॉक्टरांनी सांगितलं, की मी कोणत्याही क्षणी बाळाला गमावू शकते.”

हेही वाचा… दिव्यांग चाहत्याला ढकललं अन्…, नागार्जुन यांनी ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मागितली माफी, म्हणाले, “मी त्या गृहस्थाची…”

मीरा पुढे म्हणाली, “शेवटच्या अडीच महिन्यांमध्ये मला रुग्णालयातून बाहेर पडायचं होतं; पण बेडवरून उतरणं शक्य नव्हतं. म्हणून शाहिद माझ्या डॉक्टरांशी बोलला आणि त्यांना म्हणाला, “मी माझ्या घराला हॉस्पिटल म्हणून सेट करेन, बेड आणि सगळ्याची व्यवस्था करेन; पण तिला घरी राहू द्या.” या गोष्टींचा माझ्यावर मानसिक परिणाम होत असल्याचं त्याला दिसत होतं. मग आम्ही घरी परतलो. माझं सगळं कुटुंब मला बघायला घरी यायचं. मला सरप्राईज द्यायचे सगळे आणि त्यामुळे मी इतके भारावून गेले होते की, ते पाहून मला माझ्या समस्या लहान वाटू लागल्या. नंतर डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल व्हायला सांगितलं.”

हेही वाचा… “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने २०१५ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर एक वर्षानं २०१६ रोजी त्यांच्या आयुष्यात मीशा आली. २०१८ साली त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या जैनचं आगमन झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor wife mira rajput suffered from a miscarriage during her first pregnancy with misha dvr