हिंदी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. तिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. शहनाजच्या स्वभावाचे, तिच्या वागणूकीचे नेहमीच कौतुक होत असते. पण आता शहनाजने केलेल्या एका कृतीमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यातील शहनाजचे साधे राहणीमान पाहून सर्वजण आवक् झाले आहेत. त्यासोबतच तिचे खूप कौतुक होत आहे.

आणखी वाचा : “माझे मानसिक संतुलन…”; मनोज बाजपेयीने थांबवले होते ‘गली गुलियां’चे शूटिंग, अभिनेत्याने सांगितला धक्कादायक अनुभव

शहनाज गिलचा एक व्हिडिओ ‘४८ अवर्स इन दुबई’ या नावाने यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. शहनाज गिल नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त दुबईला गेली होती. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल दुबईमध्ये मस्तपैकी फिरताना दिसत आहे. पण लक्ष वेधले ते शहनाजच्या जमिनीवर बसून जेवण्याने. शहनाजला असे जमिनीवर बसून जेवताना पाहून सर्वजण थक्क झाले. या व्हिडीओमध्ये तिचा हा देसी अवतार पाहून चाहत्यांना त्याचा अभिमान वाटू लागला आहे आणि ते तिचे खूप कौतुक करत आहेत.

शहनाज गिलचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले. परदेशातही तिने भारतीय संस्कृती जपल्याबद्दल चाहते आनंद व्यक्त करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : अभिनेत्री शहनाज गिलच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी, याआधीही झाला होता हल्ला

शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा रंगली असून आता शहनाज आणि सलमान खानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader