शाहरुख खान असा अभिनेता आहे, जो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चांचा भाग बनतो. कधी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडीओमुळे तर कधी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हा अभिनेता सतत चर्चेत असतो. आता मात्र शाहरुख खान एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला असून नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.

७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय कलाकार ठरला आहे. मात्र, तो चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान शाहरुख खान रेड कार्पेटवर फोटोसाठी पोझ देत होता, त्यावेळी त्याने एका माणसाला ढकलल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

काय म्हणाले नेटकरी?

एका एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करताना म्हटले, “त्याने त्या म्हाताऱ्या माणसाला ढकलले, तुला लाज वाटली पाहिजे” असे म्हणत या युजरने शाहरुख खानला टॅग केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने, “तो चांगला माणूस असल्याचे ढोंग करतो, पण कायमच हे माहीत होतं की तो चांगला नाही.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे, “ही मजा नव्हती, हा त्याचा अहंकार आहे. जर त्या वृद्ध माणसाने त्याच्याबरोबर असेच वागले तर काय होईल?” दुसरा नेटकरी म्हणतो, “तो कायमच उद्धटपणे वागतो, सर्वांपेक्षा वरचढ असल्यासारखे तो वागतो.”

हेही वाचा: न हसता व्हिडीओ बघा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं चॅलेंज; नेटकरी म्हणाले, “तुम्ही सगळे एकत्र…”

काही नेटकरी अभिनेत्याला ट्रोल करत असतानाच शाहरुखच्या चाहत्यांनी ज्या माणसाला ढकलले तो त्याचा मित्र असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “शाहरुख मजा करत आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, तो शाहरुखचा जुना मित्र आहे, आता तुम्ही त्याच्याबद्दल नकारात्मकता पसरवा.”

दरम्यान, शाहरुखने लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलदरम्यान इतक्या प्रेमाने स्वागत केल्याबद्दल आभार मानले आहेत. याबरोबरच ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला, त्या ठिकाणचेदेखील कौतुक केले आहे. ही जागा अत्यंत सुंदर, सांस्कृतिक, कलात्मक आणि लोकार्नोमधील सर्वात उबदार ठिकाण आहे; जसे भारतातील घर आहे असे वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे.

आता शाहरुख खान या व्हिडीओविषयी काही स्पष्टीकरण देणार का?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader