गुरुवारी (१९ डिसेंबरला) धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅन्युअल डे सेलिब्रेशन होते. शाहरुख खान, करीना कपूर, शाहीद कपूर यांची मुलं या शाळेत शिकतात. तसेच ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्यादेखील याच शाळेची विद्यार्थिनी आहे. सध्या सोशल मीडियावर या अॅन्युअल डे सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यापैकी एका व्हिडीओने लक्ष वेधले आहे.
अॅन्युअल डे सेलिब्रेशनच्या एका व्हिडीओत शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन शाळेतील मुलांबरोबर नाचताना दिसत आहेत; तर अबराम आणि आराध्या दोघेही स्टेजवर इतर मुलांबरोबर डान्स करताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लबने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.
हेही वाचा – करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकत्र; फोटो पाहून चाहते म्हणाले, “गीत व आदित्य…”
व्हिडीओमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर डान्स करताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची मुलगी, आराध्या आणि शाहरुख-गौरीचा मुलगा अबराम दोघांनी एकत्र परफॉर्म केलं. नंतर सर्वांबरोबर मंचावर नाचले. शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’मधील ‘दिवानगी दिवानगी’ गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video: जितेंद्र ४१ वर्षे जुन्या गाण्यावर थिरकले, तर लेक एकता कपूरचा ‘ऊ लाला’वर जबरदस्त डान्स
पाहा व्हिडीओ –
आराध्या आणि अबराम यांनी मागील वर्षी २०२३ मध्ये देखील एकत्र परफॉर्मन्स केला होता. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यानंतर यंदाही या दोघांनी एकत्र परफॉर्म केलं. या दोघांचा शाहरुख खानने व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला.
हेही वाचा – ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार
दरम्यान, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅन्युअल डे सेलिब्रेशनमध्ये शाहिद कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, करण जोहर आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी आपल्या मुलांसाठी हजेरी लावली. या इव्हेंटमधील शाहिद कपूर व करीना कपूर खानचे फोटोही व्हायरल होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd