शाहरुख खानच्या ‘जवान’नंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी ‘टायगर ३’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. सलमान खान व कतरिना कैफ अभिनीत बहुप्रतिक्षित, बहुचर्चित असा ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘टायगर ३’ चित्रपटातील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक झाला आहे. या सीनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – दिवाळी पार्टीसाठी जान्हवी कपूरचा खास ग्लॅमरस लूक; रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीने वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
vikrant massey to do villain in don 3
Don 3 : ‘डॉन ३’ सिनेमात ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार खलनायकाची भूमिका; रणवीर सिंहला देणार टक्कर
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
Rakesh Roshan on karan arjun movie
Rakesh Roshan: शाहरुख-सलमान करण अर्जुन चित्रपट अर्ध्यातच सोडणार होते; पण चित्रपट हिट ठरल्यानंतर शाहरुखने थेट…

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ पाहायला मिळाला होता. यामध्ये सलमान टायगरच्या रुपात किंग खानला शत्रूंपासून वाचवताना दिसला होता. आता हेच काम शाहरुख पठाणच्या रुपात ‘टायगर ३’ चित्रपटात करताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच शाहरुखच्या खतरनाक एन्ट्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात झाली आहे.

‘टायगर ३’ चित्रपटातील या लीक सीनमध्ये सलमान शत्रूंनी घरलेला दाखवण्यात आला आहे. तेव्हाच त्याच्या जवळ एक बॉल पडतो, ज्यामध्ये ‘झूमे जो पठाण’ गाणं वाजतं. हे ऐकताच सलमान सुटकेचा निश्वास सोडून हसू लागतो. तो शरणागती पत्करून शत्रूंबरोबर जातो. तितक्यात शाहरुख खानची जबरदस्त एन्ट्री होती अन् तो सलमानला शत्रूंच्या जाळ्यातून सुरक्षितरित्या वाचवतो.

हेही वाचा – १०३ ताप, लाल डोळे घेऊन त्रिशा ठोसरने दिली होती ‘नाळ २’साठी ऑडिशन; आईने सांगितला ‘तो’ किस्सा

हेही वाचा – Video: ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

दरम्यान, सलमानच्या स्पाय थ्रीलर ‘टायगर ३’ चित्रपटाचे मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केलं असून आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान व कतरिना व्यतिरिक्त इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे.

Story img Loader