‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओलने या चित्रपटाच्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे. बहुतेक सगळेच रेकॉर्ड मोडीत काढत चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’चेही काही रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी देओल आणि शाहरुख खान यांनी एकत्र केवळ एकाच चित्रपटात काम केलं तो म्हणजे यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’. या चित्रपटानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. ‘डर’मध्ये शाहरुख खानने नकारात्मक भूमिका निभावली अन् त्या भूमिकेचं उदात्तीकरण सनी देओलला खटकल्याने नंतर त्याने शाहरुख खानबरोबर काम करायचं टाळलं.

आणखी वाचा : “हृतिकवर कोणालाच विश्वास नव्हता…” अमिषा पटेलने सांगितल्या ‘कहो ना प्यार है’दरम्यानच्या आठवणी

आता मात्र हे दोन्ही कलाकार आपआपले हेवेदावे बाजूला ठेवून इतक्या वर्षांनी मीडियासमोर एकत्र आले आहेत. शनिवार २ सप्टेंबर रोजी ‘गदर २’ची सक्से पार्टी आयोजित करण्यात आली ज्यात मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सलमान आणि आमिर यांनी तर हजेरी लावलीच, पण या पार्टीचं सर्वात मोठं आणि खास आकर्षण होतं ते म्हणजे शाहरुख खान आणि सनी देओल यांचं एकत्र येणं.

सनी आणि शाहरुखने मीडिया समोर येऊन एकत्र फोटोदेखील काढले. दोघांनी आपआपले मतभेद बाजूला ठेवल एकत्र आल्याने त्यांचे चाहतेही आनंदात होते. दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पादेखील मारल्या. सोशल मीडियावर या दोघांच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शाहरुख खाननेही नुकतंच ‘गदर २’बद्दल ट्वीट करत कौतुक केलं होतं. शाहरुख खान आणि सनी देओल यांच्या या रीयूनियनमुळे हे दोघे लवकरच एकत्र चित्रपटात दिसतील अशी भाबडी आशा या दोघांच्या चाहत्यांना आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan and sunny deol spotted together after 30 years after their cold war avn