बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट आहे. शिवाय दीपिका पदुकोण महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा गिरीजा ओकने शेअर केला आहे; ज्यावेळी शाहरुखने सहकलाकारांची माफी मागितली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटासाठी अभिनेत्री गिरीजा ओकची ऑडिशन कशी झाली? तिनेच सांगितला किस्सा

नुकतीच गिरीजा ओकने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘या चित्रपटातील एखादी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील किंवा तू आवर्जुन आठवणीत ठेवशील?’ यावर गिरीजा म्हणाली की, “अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातली एक म्हणजे पहिल्यांदा आम्ही सीक्वेंस शूट करत होतो. त्यात शाहरुखचा एक डायलॉग आणि एक मुव्हमेंट होती. त्याचा मोठा शॉट आणि क्लॉजअप असं काही-काही शूट करून झालं होतं. पण अजून एका अँगलने आम्ही शूट करत होतो. त्यामध्ये तो बोलता बोलता येतो आणि एक मुव्हमेंट घेतो. पण त्याने ती एक लाईन आधीच मुव्हमेंट घेतली. त्यानंतर तो मुव्हमेंट घेतल्या घेतल्या थांबला आणि मग त्याचा लक्षात आलं की, आपण चुकीच्या लाईनला मुव्हमेंट घेतली आहे. तर तो लगेच म्हणाला, माफ करा. माझ्यासाठी पुन्हा एकदा करूया. मला वाटलं हे झाल्यानंतर परत त्याच्या तो कामाला लागेल. पण त्याने आसपास बसलेल्या सहकलाकारांची प्रामाणिकपणे जाऊन माफी मागितली. माझ्यासाठी पुन्हा एकदा करूया, असं म्हणाला.”

हेही वाचा – Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…

पुढे गिरीजा म्हणाली की, “कारण तेव्हा खूप उशीर झाला होता, खूप वेळ शूट करत होतो. शिवाय तिकडे थंडी होती. जो त्याचा टक्कलचा लूक आहे ना, त्याच्यासाठी बाल्ड कॅप घातली होती आणि त्याच्या आतमध्ये त्याचे केस होते. या बाल्ड कॅपमुळे घाम यायला लागतो. त्यासाठीच शूटिंगच्या ठिकाणी असलेल्या एसीच तापमान खूप कमी केलं होतं. कारण जर घाम आला तर ती बाल्ड कॅप फाटायला लागते. त्यामुळे घाम येऊ नये यासाठी एसीच तापमान खूप कमी असायचं. सेटवरती आम्ही सगळे कुडकुडत असायचो. जेव्हा टेक असायचा तेव्हा सगळे जॅकेट वगैरे लगेच लपवून ठेवायचे. नाहीतर सगळे तिथे शाल वगैरे घेऊन बसले असायचे. त्यामुळे त्यालाही ते माहित होतं की, त्या वातावरणात काम करणं सोप नाही. ज्यावेळेस त्याने तो टेक घेतला तेव्हा त्याने सगळ्यांची माफी मागितली.”

हेही वाचा – मराठमोळ्या गिरीजा ओकने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंग; ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत म्हणाली…

“त्या क्षणी मला असं झालं की, साधारणपणे कोणामुळे रिटेक झाला. तर माफी मागायची काही गरज वाटतं नाही. कारण कामाचा तो भाग आहे, असं होतं. त्यात शाहरुख खान माफी मागत होता. हा कशाला माफी मागतोय, असं वाटत होतं. फक्त त्याने दाखवण्यापूरती नाही तर तो प्रामाणिकपणे माफी मागत होता. मला हा क्षण नीट लक्षात राहिली,” असं गिरीजा म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan apologized to his co stars during the shooting of jawan pps
Show comments