बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. याचे निमित्त साधत शाहरुख खानने सोशल मीडियावर Ask me anything हे सेशन घेतलं. त्यावर त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

शाहरुख खानने ट्विटरवर आयोजित केलेल्या लाइव्ह सेशनमध्ये त्यानं चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. जवळपास १५ मिनिटांचे हे सेशन होते. यावेळी त्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘सलमान खानबद्दल एक शब्द सांगाल का?’ असे त्याला विचारण्यात आले होते. त्यावर शाहरुखने माफ करा असं म्हणत उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “खूपच चांगला आणि खूपच दयाळू (माफ करा दोन शब्द झाले) पण काय करणार भाऊ आहे ना…!!” शाहरुखचे हे उत्तर ऐकून त्याच्या चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

आणखी वाचा : सलमान, शाहरुख आणि आमिर खानपैकी सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

दरम्यान सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात मधल्या काही वर्षात वादांमुळे दुरावा आला होता. काही वर्षं दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र आता त्यांच्यातील वाद संपले आहेत. ते दोघेही अनेकदा एकत्र कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात. तसेच याद्वारे प्रेक्षकांना आणि चाहत्यांना त्यांच्यातील बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात दोघंही एकमेकांच्या चित्रपटांचं प्रमोशन करताना देखील दिसले आहेत. शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील आहे.

Story img Loader