शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख व दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अधिकाधिक मेहनत घेत आहेत. दोघंही ‘पठाण’च्या प्रमोशनसाठी ‘फिफा विश्वचषक २०२२’च्या अंतिम सामन्याला पोहोचले होते. यावेळी शाहरुखने त्याच्या लूकबाबत तसेच खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – दोन्ही किडन्या निकामी, आर्थिक चणचण, औषधांचाही खर्च भागेना; प्रसिद्ध अभिनेत्रीला काम मिळणंही झालं बंद, म्हणाली, “डायलिसिसमुळे मला…”

शाहरुखने ‘पठाण’साठी त्याच्या लूकमध्ये बदल केला. त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहून तर सगळ्यांनाच सुखद धक्का बसला. पण यासाठी त्याने कशाप्रकारे मेहनत घेतली याविषयी शाहरुखने खुलास केला आहे. त्याने घरातील कामंही केली असल्याचं सांगितलं आहे.

शाहरुख म्हणाला, “चार वर्ष मी ब्रेक घेतला. तसेच करोनाकाळात मिळालेल्या वेळेचा मी उत्तम फायदा घेतला. माझ्या फिटनेसकडे मी अधिकाधिक लक्ष दिलं. मुलं व कुटुंबाबरोबर एकत्र वेळ घालवण्याची मला संधी मिळाली. करोनाकाळात आपण सगळेच घरी होतो. माझ्याकडेही फारसं काही काम नव्हतं. म्हणूनच मी माझ्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष द्यायचं ठरवलं.”

आणखी वाचा – ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानची प्रकृती बिघडली, म्हणाला, “फक्त डाळ-भात खातो कारण…”

“वर्कआऊट करणं, स्वयंपाकघरात काम करणं, कपडे धुणं ही घरातील सगळी कामं मी करायचो. घरातील बरीच कामं करुनच मी फिट राहिलो. पण ते दिवस खूप मजेशीर होते.” २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीरो’ चित्रपटासाठी मेहनत करुनही प्रेक्षकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत शाहरुखने यावेळी बोलून दाखवली. प्रेक्षकांना जे आवडेल तेच करायचं असं शाहरुखने आता ठरवलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan at fifa world cup 2022 to promote pathaam movie says washed clothes for fitness see details kmd