बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुखने त्याच्या टिकाकारांना निरुत्तर केलंच आहे. आता टाइम मॅगजीनच्या जगातील १०० प्रभावी लोकांच्या यादीत शाहरुख खानला सर्वात जास्त मतं मिळून तो या यादीत अग्रस्थानी आला आहे. ही आनंदाची बातमी ऐकून काही लोक शाहरुखचं अभिनंदन करत आहेत तर काही लोकांनी ‘टाइम मॅगजीन’ला ट्रोल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाइम’ हे एक अमेरिकेतील प्रतिष्ठित मासिक आहे. दरवर्षी या मासिकाकडून जगातील सर्वात प्रभावशाली अशा १०० लोकांची यादी जाहीर केली जाते, यात बऱ्याच बड्या लोकांचा समावेश केलेला असतो. या मॅगजीनचा वाचकवर यासाठी मतदान करतो. २०२३ च्या यादीसाठी झालेल्या मतदानात सर्वात जास्त मतं ही शाहरुख खानला आली, तब्बल १.२ मिलियन म्हणजेच १२ लाख मतं शाहरुख खानला मिळाली.

आणखी वाचा : ‘Tiger Vs Pathaan’मध्ये होणार या हॉलिवूड स्टारची एंट्री? सलमान-शाहरुखसह दीपिका-कतरिनाही येणार आमने सामने

शाहरुखबरोबरच हॅरी आणि मेगन, लिओनेल मेस्सी, एलॉन मस्क, आणि ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री मिशेल योह या दिग्गजांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. एका अमेरिकी मासिकात एवढ्या सगळ्या लोकांमधून शाहरुख खानला मिळालेली सर्वाधिक मतं यातून त्याच्या ग्लोबल स्टारडमचं दर्शन आपल्याला घडतं.

ही आनंदाची बातमी ऐकून काही लोकांनी टाइम मॅगजीनला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यामागील कारण स्पष्ट झालं आहे, टाइमने आपल्या या लेखात इतर सेलिब्रिटीजसह शाहरुखचा फोटो छापलेला नसल्याने शाहरुखचे चाहते नाराज झाले आहेत. ज्या माणसाचं नाव या यादीत पहिलं आहे त्याचाच फोटो नसल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. यामुळे सोशल मीडियावर या मॅगजीनला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी ‘पठाण’मधून जबरदस्त कमबॅक केला. आता त्याचे चाहते त्याच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.