शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ९४६ कोटी कमावले आहेत. कमाईचे वेगवेगळे विक्रम तोडणाऱ्या पठाण चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ या गाण्याचा बिहाइंड द सीन व्हिडीओ आता निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान बॅकग्राउंड डान्सर्ससह बॉस्को मार्टिसकडून कोरिओग्राफ केलेल्या डान्स स्टेपचा सराव करताना दिसत आहेत.

निर्मात्यांकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खानने मोठा खुलासा केला आहे. या गाण्यात शाहरुख खान शर्टलेस दिसला होता. पण असं करण्यासाठी मेकर्सनी भलतीच शक्कल लढवली होती. शाहरुखला या गाण्यासाठी शर्टलेस व्हायचं नव्हतं आणि यासाठी तो स्वतःच्या निर्णयावर ठाम होता. पण गाण्यासाठी असं करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला असं करावं लागलं पण त्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकाला बरीच मेहनत घ्यावी लागली होती.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”

आणखी वाचा- इन्स्टावर Live येताच MC Stan ने रचला नवा विक्रम; आधी विराट कोहली आता शाहरुख खानलाही टाकलं मागे

या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या शर्टलेस न होण्याच्या निर्णयावर दिग्दर्शक सिद्धांत आनंद म्हणतोय, “शाहरुख खूपच लाजरा आहे. गाण्यात शर्टलेस होण्यास त्याने नकार दिला होता. पण ती गाण्याची गरज होती. त्यामुळे त्याला असं करावं लागलं.” त्यावर शाहरुख त्याला म्हणतो, “मी शर्टलेस व्हावं म्हणून तू मला काल पिझ्झा खायला घालत होतास.” त्यानंतर कोरिओग्राफर बॉस्कोसुद्धा शाहरुख खानला शर्टलेस होण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. दोघांच्या बऱ्याच परिश्रमांनंतर आणि समजवल्यानंतर शाहरुख खान शर्टलेस होण्यास तयार होताना दिसतो.

आणखी वाचा- “पठाणमधून पैसे मिळाले नाही?” इकोनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या दीपिका पदूकोणला नेटकऱ्यांचा सवाल

दरम्यान ‘यशराज फिल्म’च्या बॅनरखाली तयार झालेला ‘पठाण’ चित्रपट वर्षाच्या सुरवातीचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने कमाईचे बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने केलं असून चित्रपटाता दीपिका पदुकोण, शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ९४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Story img Loader