बॉलिवूडचा बादशहा ज्याला म्हंटल जात तो अभिनेता म्हणजे शाहरुख खान. त्याचा आज ५७वा वाढदिवस आहे. दरवर्षी देशभरातून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. दरवर्षी त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी जमते. शाहरुखदेखील आपल्या चाहत्यांना येऊन त्यांना अभिवादन करतो. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे शाहरुख खानचे चाहतेदेखील त्याच्यावर प्रेम करतात.
हॉलिवूडच्या अभिनेत्यानंतर सर्वात जास्त चाहते असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा नंबर लागतो. देशातच नव्हे तर शाहरुखची चर्चा जगभरात होते. करोडो चाहत्यांचा लाडका असलेला शाहरुख मात्र कोणत्याच व्यक्तीचा चाहता नाही. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तो होता, “मी कधीही कोणत्याही अभिनेत्याचा चाहता नव्हतो, माझ्यावर कधीच कोणाचा चाहता होण्याची वेळ आली नाही कारण माझे आईवडील अगदी लहान वयातच वारले. हे मी कोणताही अहंकार न बाळगता बोलत आहे. मी चाहता नसलो कोणाचा तरी अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, मिल्खा सिंग, मोहम्मद अली, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांसारख्या लोकांमुळे प्रभावित झालो आहे.”
शाहरुखला शर्टलेस पाहताक्षणी फराह खानला व्हायची उलटी, नेमकं काय घडलं होतं?
शाहरुख खानने आल्या करियरची सुरवात मालिकांपासून केली आहे. ‘सर्कस’ ‘फौजी’ या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्याने सुरवातीलाच नकारात्मक भूमिका केल्या होत्या. त्यानंतर त्यांची ओळख रोमँटिक हिरो अशी बनली आहे. नुकताच तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.
यावर्षीही शाहरूख खानचे चाहते रात्री आपल्या लाडक्या शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ बंगल्या बाहेर चाहत्यांनी तुडुंब गर्दी असून होती.काल रात्री चाहत्यांनी शाहरुखासाठी फुलं, भेटवस्तू आणल्या होत्या. तर काहीजण शाहरुखचे पोस्टर घेऊन तिथे पोहोचले होते. काहींनी फटाकेही फोडले. आपल्या फॅन्सच्या प्रेमाखातर शाहरूख खानही रात्री त्याच्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना अभिवादन केलं.