अभिनेता आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. बॉक्स ऑफिसवर त्याचे चित्रपट तुफान कमाई करताना दिसतात. गेली अनेक वर्षे तो त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. त्याचे चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत वरच्या स्थानी आहेत. गेली १४ वर्षे त्यांनी ही जागा कायम राखली आहे. पण आता एका अभिनेत्याने त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
आणखी वाचा : आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार सिक्वेल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
आमिर खानच्या गजनी, तारे जमीन पर, थ्री इडियट्स, पिके, दंगल या सर्वच चित्रपटांनी उत्तम कमाई केली. या त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केलं. पुन्हा पुन्हा उत्तम कामगिरी करत आमिर खानच्या आधीच्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडत गेला. मात्र गेल्या वर्षी सुरु झालेल्या बॉयकॉट बॉलिवुड या ट्रेंडचा फटका आमिर खानला बसला आणि त्याचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करू शकला नाही. सलग १४ वर्ष पहिल्या क्रमांकावर असलेल्या आमिर खानला आता शाहरुख खानने मागे टाकलं आहे.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘दंगल’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत भारतातून ४५०हून अधिक कोटींची कमाई केली. ‘दंगल’ चित्रपटाने पहिल्या ३ आठवड्यांमध्ये भारतातून ३७५ कोटींची कमाई केली होती. तर आता शाहरुखच्या पठाण चित्रपटाने २ आठवड्यांमध्येच ४५० हून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे आता शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आला आहे. यामुळे आता आमिर खानचे चाहते अमीर ला तर शाहरुख खानचे चाहते शाहरुखला सोशल मीडियावर पाठिंबा देताना दिसत आहेत. आता ट्विटरवर आमिर खानच्या समर्थनार्थ ‘१४ इयर्स ऑन टॉप’ हा हॅशटॅगही ट्रेंड करू लागला आहे.