बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान गेली तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आज शाहरुख मसाला आणि अॅक्शन चित्रपट जरी करत असला तरी मध्यंतरी एककाळ असा होता ज्यात शाहरुखची कमालीची अदाकारी पाहायला मिळाली. ‘स्वदेस’ आणि ‘चक दे इंडिया’ हे त्याच काळातील चित्रपट. ‘चक दे इंडिया’मधल्या शाहरुखची तर प्रेक्षक आजही आठवण काढतात. भारतीय महिला हॉकी संघाला वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या प्रशिक्षक कबीर खानचं पात्र शाहरुखने उत्तमरित्या वठवलं होतं.

आणखी वाचा : सैफ अली खानला गंभीर दुखापत; मुंबईच्या रुग्णालयात अभिनेत्यावर शस्त्रक्रिया सुरू

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

खासकरून या चित्रपटाच्या शेवटी जेव्हा भारतीय महिला हॉकी संघ अंतिम सामना जिंकतो तेव्हा शाहरुखच्या चेहेऱ्यावरचे हावभाव आणि त्यामागे वाजणारं ‘मौला मेरे ले ले मेरी जान’ हे गाणं म्हणजे या चित्रपटाचा सर्वोच्च बिंदु. पण तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे की हे गाणं या चित्रपटासाठी बनवण्यात आलंच नव्हतं. संगीत दिग्दर्शक जोडी सलीम-सुलेमान या दोघांनी मिळून हे गाणं संगीतबद्दल केलं होतं. हे गाणं शाहरुखच्या या चित्रपटासाठी नव्हे तर नागेश कुक्कुनूर यांच्या एका चित्रपटासाठी तयार करण्यात आलं असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना याविषयी सलीम म्हणाले, “जेव्हा शाहरुख भावुक होऊन तिरंग्याकडे पाहतो, तो भाग चित्रपटासाठी फार महत्त्वाचा होता. त्यासाठी एक वेगळं आणि उत्तम असं पार्श्वसंगीतही तयार केलं होतं. पण यशजी तेव्हा म्हणाले की या ठिकाणी एक गाणं असायला हवं. एका आठवड्यावर चित्रपटाची रिलीज डेट आली होती. आम्ही जेव्हा पुन्हा स्टुडिओमध्ये आलो तेव्हा ‘डोर’ चित्रपटासाठी केलेलं गाणं आम्हाला सापडलं.”

स्टुडिओमध्ये आल्यावर संध्याकाळी ७ किंवा ८ पर्यंत सलीम-सुलेमान यांनी गाणं तयार केलं. केवळ एक प्रयोग म्हणून केलेलं गाणं त्या सीनच्यावेळी अगदी चपखल बसलं आणि लोकांनी इतर गाण्यांप्रमाणे ते गाणेदेखील डोक्यावर घेतले. ‘मौला मेरे’ हे गाणं जयदीप सहानी यांनी लिहिलं आहे. ‘चक दे इंडिया’मध्ये हे गाणं अत्यंत योग्य ठिकाणी आल्याने त्याचा परिणामही तसाच होतो.

Story img Loader