शाहरुख खानचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट चांगलाच चर्चेत आहेत. चित्रपटातील गाण्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करायचीही मागणी होत आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारच कमी दिवस राहिले आहेत तरी ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित झाला नसल्याने सगळेच संभ्रमात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चांगलाच सक्रिय झाला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली.

आणखी वाचा : केवळ ९८ सेकंदात ‘RRR’चा शो हाऊसफुल्ल; विक्रमी तिकीटविक्री करत बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई

एका चाहत्याने गंमत म्हणून शाहरुखला विचारलं कि, “सर एक ओटीपी आला असेल, सांगता का?” यावर त्या चलाख चाहत्याला उत्तर दिलं की, “मी एवढा प्रसिद्ध आहे की मला ओटीपी येत नाही, मला जेव्हा काही हवं असतं ते मी ऑर्डर करतो, समोरची व्यक्ती मला थेट सामान पाठवते.” शाहरुखच्या या उत्तरावर मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लगेच एक उत्तर देण्यात आलं ज्याची भरपूर चर्चा झाली. मुंबई पोलिसांनी ओटीपी म्हणून ‘१००’ एवढंच पोस्ट करत शाहरुख आणि त्या चाहत्याला टॅग केलं.

शाहरुखच्या या सेशनमध्ये मुंबई पोलिसांनीही सहभाग घेत धमाल आणली. या माध्यमातून शाहरुखने त्याच्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘पठाण’चा ट्रेलर १० तारखेला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चाहते आणि चित्रपटप्रेमी याची आतुरतेने वाट पहात आहेत.