गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. प्रेक्षकांनी ‘पठाण’ पहिल्याच दिवशी पाहता यावा म्हणून अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलं. जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : फटाके फोडले, ढोल-ताशाच्या तालावर बेभान होऊन नाचले अन्…; शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी

चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर फटाके फोडण्यात आले. तसेच ढोल-ताशा पथकावर नाचत चित्रपटगृहांबाहेरच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. आता एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बऱ्याच वर्षांनंतर शाहरुखचं रुपेरी पडद्यावर पुनरागमन झालं आहे. याचाच आनंद त्याचे चाहते सेलिब्रेट करत आहे. शाहरुखवर आपलं किती प्रेम आहे हे त्याच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. काही तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये त्यांनी पठाण हेअरकट केला आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होताच बॉलिवूडवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “चित्रपटसृष्टीचा दर्जा…”

पठाण हेअरकट म्हणजे त्यांनी केसांमध्ये पठाण हे नाव कोरलं आहे. या तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे दीपिका व जॉन अब्राहमच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan crazy fans pathaan haircut video goes viral on social media see details kmd