बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत सामील असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेले अनेक दिवस ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अशातच त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा लहानपणापासून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत आणि अनेक कार्यक्रमांना ते एकत्र दिसले आहेत. तर लवकरच ते दोघं झोया अख्तरच्या ‘द अर्चिस’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते दोघंही एकत्र बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा त्यांचा एक फोटो चर्चेत आला आहे.
गेले अनेक महिने अगस्त्य आणि सुहाना एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही अनेकदा समोर येत असतात. आता असाच त्यांचा एक अनसीन फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अगस्त्य सुहानकडे पाठ करून कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. तर सुहान अगस्त्यच्या मागे उभी राहून त्याच्याकडे पाहून लाजताना दिसत आहे.
हेही वाचा : Video: “ही कोण…” सुहाना खानला मागे टाकत तिच्याबरोबरच्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा
आता त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत “ते दोघं एकत्र खूप छान दिसत आहेत,” असं म्हणत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार कपूर कुटुंबाने आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत अगस्त्यने त्याच्या घरच्यांना सुहानाची ओळख त्याची पार्टनर म्हणून करून दिली होती. पण अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याला ऑफिशियल केलेलं नाही.