शाहरुख खानची मुलगी सुहाना खान गेल्या काही काळापासून तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपटाच्या चर्चेदरम्यान सुहानाने जमीन खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. सुहानाने शेती करण्यासाठी दीड एकर जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी सुहानाने स्वतः शेतकरी असल्याचं म्हटलं आहे.
‘आदिपुरुष’ला स्पेशल ऑफरचाही फायदा नाहीच! सातव्या दिवसाची आकडेवारी पाहून बसेल धक्का
सुहानाने अलिबागमध्ये जमीन खरेदी केली असून तिची किंमत जवळपास १२.९१ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. जमिनीचा व्यवहार १ जून रोजी झाला आहे. त्यासाठी सुहानाने ७७ लाख ४६ हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी जमा केली आहे. अलिबागमध्ये अंजली, रेखा आणि प्रिया या तीन बहिणींकडून ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, अलिबागमध्ये शाहरुख खानची आधीपासून प्रॉपर्टी आहे.
हेही वाचा – कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
अलिबागमध्ये घर आणि जमीन विकत घेणार्या अनेक अभिनेत्रींपैकी सुहाना खान एक बनली आहे. याशिवाय जूही चावलानेही तिच्या मालमत्तेचे फार्ममध्ये रूपांतर केले आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांचीही अलिबागमध्ये प्रॉपर्टी आहे.
सुहानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ‘द आर्चीज’चे टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. या चित्रपटात सुहाना खानसह श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.