शाहरुख खानचा लेक आर्यन खान नोरी फतेहीला डेट करतोय अशा चर्चा सुरू आहेत. दोघांचेही दुबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आता किंग खानची लेक सुहाना खान महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला डेट करत असल्याचं समोर आलंय. अगस्त्य आणि सुहाना यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जातोय.
सुहाना व अगस्त्य ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. अमिताभ बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा नुकत्याच कपूर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत पोहोचला होता. अगस्त्य हा राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा नातू आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने एका सूत्राच्या हवाल्याने वृत्त दिलंय की, कपूर कुटुंबाच्या या ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्यने तिच्या कुटुंबातील सदस्यांना सुहानाची जोडीदार म्हणून ओळख करून दिली होती.
आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? दुबईतील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
रिपोर्ट्सनुसार, या दोघांमधील नात्याची सुरुवात झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या सेटवर झाली. सूत्राने सांगितले की ते दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात आणि ते त्यांचा बाँड लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. पण त्यांना सध्या हे नातं जाहीर करायचं नसल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. तसेच श्वेता नंदालाही सुहाना खूप आवडते आणि तिचा दोघांच्याही नात्यावर कुठलाच आक्षेप नाही, असंही कळतंय.
दरम्यान, दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सेटवरचा बाँड फक्ती मैत्री आहे की त्या पलीकडे आहे, याबाबत येत्या काळातच कळेल.