२०२३मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी शाहरुख खानची लेक सुहाना खान ( Suhana Khan ) नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो, व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी सुहाना खान इंडोनेशियातील बाली येथे गेली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नुकतीच सुहाना कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदाबरोबर ( Agastya Nanda ) पाहायला मिळाली. यावेळी श्वेता बच्चन-नंदादेखील होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून शाहरुख खानची लेक सुहाना खान व अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील सुहाना व अगस्त्यच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून या दोघांच्या सुरू झालेल्या अफेअरच्या चर्चा अजूनही रंगल्या आहेत. दोघांचे कधी नाइटक्लबमधील पार्टीतील, इतर कधी वेगवेगळ्या कार्यक्रमातील व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात. सध्या सुहाना व अगस्त्यच्या नव्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘फिल्मीग्नान’, ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओंमध्ये सुहाना व अगस्त्य एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी दोघांबरोबर अगस्त्यची आई, अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन-नंदा पाहायला मिळत आहे. तिघं खास डिनरसाठी एकत्र भेटल्याचं म्हणत आहेत. पण, या व्हिडीओंमुळे सुहाना आणि अगस्त्य नंदाच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

सुहाना व अगस्त्यच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “चांगली केमिस्ट्री आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, अरे सासूबाई पण बरोबर आहेत? तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे दोघं डेट करत आहेत.”

दरम्यान, सुहाना खान व अगस्त्य नंदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सुहाना लवकरच शाहरुख खानसह ‘द किंग’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रकरण काही दिवसांत सुरू होईल. तसंच अगस्त्य ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अगस्त्यने लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader