अभिनेते चंकी पांडे यांची भाची, अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिचं आज लग्न आहे. ते काही दिवस तिच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. विचार मेहंदी आणि संगीत सोहळ्याला फक्त तिच्या घरच्यांनीच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक बड्या स्टार्सनी आणि स्टारकिड्सनी देखील हजेरी लावली. दरम्यान चा शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. परंतु या व्हिडिओमध्ये सुहाना नाही तर एका वेगळाच व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं.

अलानाच्या संगीत सोहळ्याला अलवीरा खान, किम शर्मा, महीप कपूर, शिबानी दांडेकर, पलक तिवारी , दीया मिर्जा, अनुषा दांडेकर, सुहाना खान यांसारखे अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. या सोहळ्या दरम्यानचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाच एका व्हिडीओमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत आला. तिने पांढऱ्या रंगाची शिमरी साडी नेसली होती. पण तिच्या या व्हिडीओमध्ये एका वेगळ्याच व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं.

Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…

आणखी वाचा : Video: शाहरुख खानच्या लेकीला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का, म्हणाले, “सुहाना तर…”

अलानाच्या संगीत सोहळ्यातील सुहाना खानचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. यात सुहाना दरवाज्यातून बाहेर येत तिच्या गाडीमध्ये बसताना दिसत आहे. सुहाना खान येणार म्हणून तिथे पापराझी तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. परंतु दरवाजा उघडला आणि सुहानाच्या आधी एक मुलगी धावत बाहेर येताना दिसली. तिच्या पाठोपाठ सुहाना देखील आली आणि गाडीत जाऊन बसली. ही मुलगी नक्की कोण होती हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण तिने धावत घेतलेल्या एन्ट्रीने ती चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “मला अभिनयातलं कळत नाही…” सुहाना खानच्या डायरीत शाहरुखने लेकीसाठी लिहिला खास संदेश

हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “ती सुरुवातीला मुलगी पळून का गेली हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “सुरुवातीला ती मुलगी अशी पळून गेली जसं काय जेवण संपेल.” तर आणखी एकाने लिहिलं, “सुहानापेक्षा तीच चांगली दिसत आहे.” त्यामुळे आता सुहानाच्या एन्ट्री च्या आधी जी मुलगी पळून गेली ती चर्चेचा विषय ठरत आहे.

Story img Loader