बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. पण त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलंही नेहमीच चर्चेचा विषय बनतात. शाहरुख खान ची लेक सुहाना ही त्यातलीच एक स्टारकिड आहे. सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असलेली सुहाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे. नुकतंच तिला मुंबईत तिच्या आईबरोबर पाहण्यात आलं. यावेळी तिचा नो मेकअप लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सुहाना अजून अभिनय क्षेत्रात आली नसली तरीही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक असतात. ती देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. आता अशातच तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Ishika Taneja takes diksha left showbiz mahakumbh 2025
प्रसिद्ध अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा, ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले; म्हणाली, “स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
Bollywood actor shah rukh khan fixes daughter suhana khan dress video viral
Video: पापाराझींसमोर लेकीचे कपडे नीट करताना दिसला शाहरुख खान, सुहानाबरोबरचा व्हिडीओ व्हायरल
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Sridevi
श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी न्यायाधीशांनी तिला कोर्टात…, ज्येष्ठ वकिलांनी सांगितला ‘तो’ किस्सा

आणखी वाचा : तिसऱ्या वीकेण्डला ‘वेड’ची दमदार कामगिरी, सुरु केली ५० कोटींकडे वाटचाल

सुहाना आणि गौरी खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुहाना गाडीमध्ये बसलेली दिसत असून आईची वाट बघत आहे. मीडिया फोटोग्राफर्सकडे पाहून सुहानाने त्यांना स्मित हास्य दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचबरोबर ते आपले फोटो काढत आहेत हे कळल्यावर तिने तिचं जॅकेटही नीट केलं. यावेळी सुहानाने अजिबात मेकअप केला नव्हता. ती नो मेकअप लूकमध्ये दिसली.

हेही वाचा : “मला अभिनयातलं कळत नाही…” सुहाना खानच्या डायरीत शाहरुखने लेकीसाठी लिहिला खास संदेश

सुहानाला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकरी आवक् झाले. सुहाना मेकअप केल्यावर जितकी छान दिसते तितकीच छान ती विना मेकअपही दिसते, असं अनेकांनी म्हटलं. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या वर्षाव करत सुहानाच्या दिसण्याचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “शाहरुखची लेख काहीही केलं तरी सुंदर दिसते. ती कधीही कुठलाही ड्रामा करत नाही, तसंच स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही हटके करताना दिसत नाही, जे इतर सेलिब्रिटींची मुलं करतात.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही विना मेकअप खूप सुंदर दिसते.” आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Story img Loader