सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता सर्व सामान्यांबरोबरच सेलिब्रिटी मंडळीही दिवाळी सेलिब्रेशनमध्ये रमले आहेत. क्रिती सेनॉनने बॉलिवूडकरांसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. आता सुप्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने दिवाळी पार्टी आयोजित केली होती. त्याच्या या पार्टीला बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. याचेच काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच शाहरुख खानची लेक सुहाना खानने या पार्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

शाहरुखची लेक सुहाना कॅमेऱ्यासमोर फारशी येत नाही हे कित्येकदा व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसून येतं. पण आता बऱ्याचदा बॉलिवूड पार्ट्यांना सुहाना आवर्जून हजेरी लावते. मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीलाही तिने हजेरी लावली. तिची एंट्री झाली अन् सुहानाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या.

पाहा व्हिडीओ

सुहाना डिझायनर साडी नेसून दिवाळी पार्टीला पोहोचली. पण यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सुहाना गाडीमधून खाली उतरताच तिला साडीमध्ये नीट चालता येत नसल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलं. शिवाय साडी सांभाळणंही सुहानासाठी कठीण झालं होतं.

आणखी वाचा – Video : कराडजवळील गावी गेला अन् शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

सुहानाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. साडी सांभाळता येत नाही, साडीमध्ये सुहानाचा चालणं कठीण झालं आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. तर काहींनी तिला आंटी म्हटलं आहे.

Story img Loader