बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान, विमानतळाच्या प्रकरणामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटावर तो मेहनत घेत आहे. मात्र सध्या त्याच्या एक जुन्या चित्रपटाची चर्चा ससुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख दीपिका याआधी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामे केली होती. नुकतीच या चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शाहरुखच्या काही चाहत्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. भारतातील २० शहरात १७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

“माझी राजकीय विचारधारा ही…” अनुपम खेर यांनी मुलाखतीत केला खुलासा

या महिन्याच्या सुरुवातीला, शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त, ‘DDLJ’ च्या निर्मात्यांनी देशातील काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला. इतर अनेक नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाने जास्त कमाई केली होती.

‘ओम शांती ओम’ हा दीपिका पदुकोणचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. तर शाहरुख खानने चित्रपटाची निर्मिती केली होती. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यात दिसला होता.