गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. प्रेक्षकांनी ‘पठाण’ पहिल्याच दिवशी पाहता यावा म्हणून अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलं. जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील सलमान खानचा ‘तो’ सीन लीक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आता तर शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित झाला म्हटल्यावर देशभरातील चित्रपटगृहांबाहेर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी सात वाजता पहिला शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली असल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. चित्रपटगृहाबाहेरील गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही ठिकाणी शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले. तर काही ठिकाणी ढोल-ताशावर चाहते आनंदाने नाचताना दिसले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच सकाळचा शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शाहरुखला बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी दाखवलेला उत्साह कमालीचा आहे.

‘पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे दीपिका व जॉन अब्राहमच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सुरुवातीला या चित्रपटाबाबत बरेच वाद रंगले. मात्र त्याचा चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan deepika padukone pathaan movie audience line up outside theaters to watch film see details kmd