शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभर प्रदर्शित होणार आहे. पण त्याचपूर्वी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुखच्या काही चाहत्यांनी तर चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. काही शहरांमध्ये तर ‘पठाण’चं तिकिट २४०० रुपयांपर्यंत विकलं जात आहे. शाहरुखच्या याा चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच काही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
आणखी वाचा – “एक चट्टान, सौ शैतान” अंगावर काटा आणणारा अजय देवगणच्या ‘भोला’चा टीझर प्रदर्शित; तुम्ही पाहिलात का?
‘पठाण’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहता यावा यासाठी ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली आहेत. याबाबतीत ‘पठाण’ने ‘बाहुबली २’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘पहिल्या दिवशी चित्रपट पाहता यावा यासाठी बाहुबली २’ची ६ लाख ५० हजार तिकिटं बुक करण्यात आली होती. या तुलनेत ‘पठाण’ चित्रपट पुढे आहे.
आतापर्यंत ‘पठाण’ची ८०५,९१५ तिकिटं बुक करण्यात आली आहेत. याबाबत शाहरुख-दीपिकाच्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. म्हणजेच २३ जानेवारीपर्यंत या चित्रपटाने जवळपास २४ कोटी २९ लाख रुपये कमाई केली आहे. ‘पठाण’ प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार अशी चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबरीने जॉन अब्राहमलाही या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालणार अशी चिन्ह दिसत आहेत.