शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद आणखीनच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शाहरुखचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोमल नाहटा यांच्या शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये सोशल बॉयकॉटमुळे तुमचं नुकसान होत आहे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात येत आहे. यावर शाहरुख सडेतोड उत्तर देतो.
पाहा व्हिडीओ
शाहरुख म्हणतो, “मी थोडी हवेमुळे हलणार आहे. झाडं हवेमुळे हलतात मी नाही. ज्या लोकांनी बॉयकॉट केलं ते लोक खूप खूश असतील. बॉयकॉट करणारे लोकही आमच्यामुळे खूश आहेत. पण भारतात जेवढं माझ्यावर प्रेम केलं जातं ते प्रेम फार कमी लोकांना मिळतं हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो.”
“एक किंवा दोन गोष्टींमुळे लोकांचं आपल्यावर असणारं प्रेम काही कमी होत नाही. माझ्यावर किंवा माझ्यावर सोशल बॉयकॉटचा काही परिणाम झाला असावा असं मला वाटत नाही.” शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल.